
मुंबई : राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे काल (रविवारी) सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्ह्णून त्यांना ओळखले जात होते. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर त्यांनी त्या ५ हजारावर अब्जावधी रुपये कमावले. त्यामुळेमध्यमवर्गीय गुंतवणूकदार वर्गामध्ये राकेश झुनझुनवाला हे लोकप्रिय होते. राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे सर्व गुंतवणूकदारांचे कायम लक्ष असायचे.
मागच्या काही दिवसांपूर्वीच झुनझुनवाला यांनी ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. ते मागच्या काही वर्षांपासून आजारी होते. नंतर त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. पण, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० ला हैद्राबाद या ठिकाणी झाला. पहिल्यांदा ते चार्टर अकाउंटंट होते नंतर त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत ते शेअर मार्केट किंग बनले. माहितीनुसार राकेश झुनझुनवाला हे आपल्यामागे ४० हजार करोडची संपत्ती सोडून गेले आहेत.