अभिनेत्री राखी सावंतची आई जया यांचे निधन झाले आहे. राखी सावंत हिच्या आईला ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने असे दोन आजार होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील चालू होते मात्र त्यांनी काल संध्याकाळी शेवटचा श्वास घेतला आहे.
‘पठाण’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पठाण चित्रपटात खूप…”
जया यांच्यावर मुंबईमधील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता. मात्र काल रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. आदिल दुर्रानीने जया यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
रशियाचा मुलगा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळेत रमला! चक्क मराठीचे गिरवतोय धडे
राखी सावंतची आई गेल्याने सर्वजण तिच्या दुःखात सहभागी झाले आहेत. मात्र राखीच्या वागणुकीमुळे तिच्यावर जोरदार टीका होत असल्याचे दिसत आहे. आई गेली तरी राखीचा ड्रामा चालूच आहे. यामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी तिला कमेंट मध्ये शिव्या दिल्या आहेत. आई गेली तरी तुझी नौटंकी थांबेना, या शब्दत नेटकऱ्यांनी राखीला सुनावले आहे.
मोठी बातमी! अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन
सध्या राखी सावंतचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये एक व्हिडओ रुग्णालयातील असून आईच्या निधनानंतर तिने हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामुळे आई जाऊन देखील तू व्हिडीओ कसकाय शेअर करू शकते असा सवाल संतापलेल्या नेटकऱ्यांनी राखी सावंतला केला आहे.