अभिनेत्री राखी सावंतची आई जया यांचे निधन झाले आहे. राखी सावंत हिच्या आईला ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने असे दोन आजार होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील चालू होते मात्र त्यांनी काल संध्याकाळी शेवटचा श्वास घेतला आहे.
जया यांच्यावर मुंबईमधील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता. मात्र काल रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. आदिल दुर्रानीने जया यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
मोठी बातमी! उजनी पाटबंधारे विभागाचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी; उभी पिके गेली वाहून
आईच्या मृत्यूनंतर राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडिओमध्ये राखी सावंतला सलमान खानची आठवण झाली आहे. हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की राखी खूप रडते. यावेळी सलमान खानची आठवण काढत राखी म्हणाली, सलमान भाई मां मर गई. हे वाक्य राखी सतत बोलताना दिसत आहे.
आई गेली तरी राखी सावंतचा ड्रामा संपेना! संतापलेल्या नेटकऱ्यांनी अक्षरशः दिल्या शिव्या