अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील जोडप्याने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सध्या या नवरा-बायकोची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे. हे दोघे एकाचवेळी MPSC परीक्षा पास होऊन क्लास वन अधिकारी बनले आहेत. मोठं अधिकारी व्हायचं स्वप्न सर्वांचंच असत. तसेच या जोडप्याचं देखील अधिकारी व्हायचं स्वप्न होत. यासाठी त्यांनी दिवसरात्र अभ्यास करत हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
सुरेश चासकर आणि मेघना चासकर (Suresh Chaskar and Meghna Chaskar) असे या नवरा-बायकोच नाव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक यादी जाहीर केली असून एकाचवेळी या दोघांचे नाव समोर आले आहे. दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेत (Maharashtra Engineering Services Exam) वर्ग १ पदी निवड झाली आहे.
भर लग्नमंडपात नवरदेवाने नवरीसमोर दुसऱ्या मुलीला केली किस; पाहा VIDEO
या दोघांनी संसार त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यासाठी त्यांच्या कुटुंबीयाने सुद्धा त्यांना मोठी साथ दिली. त्याचबरोबर त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले आणि आज दोघेही क्लास वन अधिकारी झाले आहेत. त्यामुळे सगळीकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
आईच निधन होताच राखीला आली सलमान खानची आठवण; मोठमोठ्यानं रडत म्हणाली…