मुंबईमध्ये शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) या ठिकाणहून सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदू संघटना (Hindu Association) या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा मोर्चा लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी काढण्यात आला आहे.
कौतुकास्पद! नवरा-बायको एकाचवेळी बनले क्लास वन अधिकारी; MPSC परीक्षेत मोठे यश
शिवाजी पार्क या ठिकाणहून हा मोर्चा सुरु झालेला असून या मोर्चामध्ये भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते देखील सामील झाले आहेत. नागरिकांनी देखील या मोर्चाला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये उपस्थित झाले आहे. त्याचबरोबर या मोर्चामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
सात किलो वजन असलेल्या बाळाचा झाला जन्म; बाळ पाहून डॉक्टरही हैराण
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व महिला करत आहेत. दरम्यान, या मोर्चात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे. मोर्चामध्ये भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते देखील सामील झाले आहेत.
भर लग्नमंडपात नवरदेवाने नवरीसमोर दुसऱ्या मुलीला केली किस; पाहा VIDEO