मागच्या काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. यानंतर त्यांच्यावर योग्य तो उपचार होऊन त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते अपघातातून बरे झाले आहे. मात्र, त्यांना डॉक्टरांनी घरी बसून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता धनंजय मुंडे यांनी बेडवरुन भाषण करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबईत लव्ह जिहाद विरोधात मोर्चाला सुरुवात
धनंजय मुंडे म्हणाले, येत्या काळात महाविकास आघाडी मराठवाड्यातील सर्व निवडणुका जिंकणार असून दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच लागणार नाही. असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ परळी येथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन भाषण करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
सात किलो वजन असलेल्या बाळाचा झाला जन्म; बाळ पाहून डॉक्टरही हैराण
त्याचबरोबर ते बोलताना पुढे म्हणाले, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी अपघातातून बचावलो आहे. मी तुमच्याशी बेडवरुन संवाद साधेल असं माझ्या स्वप्नात देखील आले नव्हते. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
कौतुकास्पद! नवरा-बायको एकाचवेळी बनले क्लास वन अधिकारी; MPSC परीक्षेत मोठे यश