उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) कायम चर्चेत असतात. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका मोठ्या भाजप नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. खेमचंद गरपल्लीवार असे या भाजप नेत्याचे नाव आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबईत लव्ह जिहाद विरोधात मोर्चाला सुरुवात
खेमचंद (Khemchand Garpalliwar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यामुळे चंद्रपूर पोलिसांनी खेमचंद गरपल्लीवार यांना वर्षभरासाठी तडीपार केले आहे. चंद्रपूर येथील गोडपिंपरी येथे हा प्रकार घडला आहे.
“…तर दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच लागणार नाही”, बेडवरून भाषण करत धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल
खेमचंद गरपल्लीवार यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यावेळी अमृता फडणवीस यांनी त्यांचे एक पंजाबी गाणे प्रदर्शित झाल्यानंतर वेश्या व्यवसायावर मत मांडले होते. त्यावर गरपल्लीवार यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले व त्यांनी खेमचंद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गरपल्लीवार यांना आता एका वर्षासाठी चंद्रपूरमधून तडीपार करण्यात आले आहे.
सात किलो वजन असलेल्या बाळाचा झाला जन्म; बाळ पाहून डॉक्टरही हैराण
खेमचंद गरपल्लीवार यांच्यावर याआधी देखील गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये अश्लील शिवीगाळ करून लोकांना धमकावणे, जमिनी बळकावणे, लोकांची फसवणूक करणे, विनयभंग या गोष्टींचा समावेश आहे. गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती म्हणून त्यांना ओळखले जाते.
कौतुकास्पद! नवरा-बायको एकाचवेळी बनले क्लास वन अधिकारी; MPSC परीक्षेत मोठे यश