मुंबईमध्ये शिवाजी पार्क (Mumbai Shivaji Park) या ठिकाणहून सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. अनेक हिंदू संघटना (Hindu Association) या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा मोर्चा लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी काढण्यात आला आहे.
ब्रेकिंग! आरोग्यमंत्र्यावर भरसभेत अज्ञाताने झाडल्या गोळ्या
शिवाजी पार्क या ठिकाणहून हा मोर्चा सुरु झालेला असून या मोर्चामध्ये भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते देखील सामील झाले आहेत. दरम्यान, या मोर्चावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत या मोर्चाची खिल्ली उडवली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला लव्ह जिहादचा अर्थ माहीत नाही. मात्र ‘लव्ह’चा अर्थ मला कळतो. ‘जिहाद’चा अर्थ मला माहित नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात; ‘या’ भाजप नेत्यावर झाली कारवाई
दरम्यान, लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व महिला करत आहेत. दरम्यान, या मोर्चात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे. मोर्चामध्ये भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते देखील सामील झाले आहेत.
“…तर दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच लागणार नाही”, बेडवरून भाषण करत धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल