पुणे येथील येरवडा भागात पुन्हा एकदा दोन गटात तुफान राडा झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात सतत अशा घटना घडत असल्याने या ठिकाणी पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एका रात्रीत बनला लखपती, तरुणाला ७० लाखांची लागली लॉटरी
याठिकाणी झालेल्या वादात तरुणांनी चक्क घरावर दारूच्या बाटल्या ( Alchohole Bottels) फोडल्या आहेत. इतकंच नाही तर हातात कोयते व तलवारी नाचवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे.
यावेळी एका तरुणाच्या डोक्यात कोयता मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये एक 19 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. याशिवाय यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
सानिया मिर्झाची एकूण संपत्ती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये चार अल्पवयीन मुलांवर ( Under Aged Boys) खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे व दहशत माजविणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.