
प्रेमात खूप ताकद असते असे म्हंटले जाते. एखाद्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो. अगदी सातसमुद्रही पार करू शकतो. अगदी अशीच घटना उत्तर प्रदेशमध्ये (UP) घडली आहे. येथील एका तरुणावर प्रेम असलेली तरुणी चक्क स्वीडनहून लग्नासाठी भारतात आली, आणि विशेष म्हणजे तिने भारतीय संस्कृतीनुसार (Indian Culture) त्याच्याशी लग्न देखील केले.
चाहता असावा तर असा! अपंग व्यक्ती मित्राच्या पाठीवर बसून गेला ‘पठाण’ चित्रपट पहायला
एटा जिल्ह्यातील अवघड शहरात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. स्वीडन हुन आलेल्या (Bride from Swiden) या तरुणीचे पवन या तरुणावर प्रेम होते. या दोघांचीही ओळख फेसबुकवर झाली होती. यानंतर त्यांचे प्रेमात रूपांतर झाले. मागील दहा वर्षांपासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. आता मात्र त्यांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.
मोठी बातमी! नवणीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित
क्रिस्टन असे या तरुणीचे नाव आहे. डेहराडून येथे नोकरी करणाऱ्या पवनची फेसबुकवर क्रिस्टन सोबत ओळख झाली होती. दोघेही फोन आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलायचे. दरम्यान हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एक वर्षांपूर्वी हे दोघे प्रथमच आग्रा येथे भेटले. यावेळी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
पुण्यात दोन गटात राडा! कोयत्यांचा वापर करून केली तुफान मारामारी
त्यांच्या या निर्णयावर दोघांच्याही कुटूंबांनी आक्षेप घेतला नाही. अवगड येथील जलसर रोड वर असणाऱ्या प्रेमा देवी शाळेत या दोघांनी लग्न केले. यावेळी पवनचे वडील पिताम सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या आनंदातच आम्ही आनंदी आहोत.