हार्दिक पांड्याचं कार आणि घड्याळांचं कलेक्शन पाहून फिरतील डोळे; वाचा सविस्तर

Hardik Pandya's car and watch collection will roll your eyes; Read in detail

हार्दिकने टिम इंडियामध्ये खूप मोठं स्थान मिळवलं आहे. टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं एवढं सोप नव्हतं, त्यासाठी हार्दिकला खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. हार्दिकच्या कार आणि घड्याळ कलेक्शन बाबत पाहिलं तर, रोल्स राॅयस, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज जी, ऑडी6 आणि जीप कंपास या सर्व महागड्या कार हार्दिक पांड्याकडे आहेत. या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.

फेसबुकवर झाली ओळख अन् तरुणी लग्न करण्यासाठी थेट स्वीडनवरून भारतात आली

त्याचबरोबर हार्दिकच्या घड्याळ्यांबद्दल पाहिलं तर पाटेक फिलिप नाॅटिलस प्लेटिनम 5712R, रोलेक्स काॅस्मोग्राफ डेटोना (Rolex Cosmograph Daytona) त्याचबरोबर 18 कॅरेट रोझ गोल्डचे ऑडेमार्स प्युगेटचे (Audemars Piguet) देखील घड्याळं हार्दिककदे आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचे केले कौतुक; दोघींमधील वाद मिटल्याची चिन्हे!

हार्दिक पांड्याचा जीवनप्रवास –

हार्दिक पांड्याचा जन्म गुजरातच्या सूरतमध्ये 11 ऑक्टोबर 1993 ला झाला. त्याच्या कुटुंबाबद्दल पहिले तर त्याची घरची परिस्थिती हलाखीचीच होती. पण परिस्थिती किती हालाखीची असली तरी आईवडील आपल्या मुलांना कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. तसेच हार्दिकच्या वडिलांनी देखील त्याला क्रिकेटसाठी कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिलेली नाही.

चाहता असावा तर असा! अपंग व्यक्ती मित्राच्या पाठीवर बसून गेला ‘पठाण’ चित्रपट पहायला

हार्दिकच्या शिक्षणाबाबत आपण पहिले तर त्याला शिक्षणाची जास्त आवड नव्हती. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड असंल्यामुळे त्याला अभ्यासाबाबत कधी लळा निर्माण झालाच नाही. तो जास्तीत जास्त क्रिकेटचं खेळायचा त्यामुळे त्याने अभ्यास ही गोष्ट जास्त कधी केलीच नाही. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शिक्षणात आवड नसल्याने त्याने नववीत तो नापास झाला. आणि नापास होताच त्याने त्याच ठिकाणी त्याचा शैक्षणिक प्रवास थांबवला. शिक्षण थांबवल्यांनतर हार्दिकने आपला पूर्णवेळ क्रिकेटला दिला. त्यावेळी अशी परिस्थिती होती की हार्दिककडे स्वत:च क्रिकेट किट देखील नव्हतं. तो बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून किट घेऊन सराव करत असे.

चंद्रकांत पाटलांची ज्योतिबांशी केलेल्या तुलनेबद्दल चित्रा वाघ यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाल्या…

एका मुलाखतीती हार्दिक पांड्या म्हणाला होता की, एक काळ असा होता की, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. पैसे नसल्याने केवळ मॅगी खाऊन दिवस काढले. क्रिकेट खेळण्यासाठी त्याने ट्रकने देखील प्रवास केला आहे. असे त्याने सांगितले. मात्र आता ज्या हार्दिक पांड्याची एकेकाळी जेवणाची चिंता होती त्याची आज श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये गणना होते. हार्दिकने दमदार गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने टीम इंडियामध्ये आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

मोठी बातमी! नवणीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *