शेतकरी (farmer) शेतीसोबत अनेक उद्योग देखील शेतामध्ये करत असतात. यामध्ये आता बारामती तालुक्यातील माळेगावमधील गव्हाणे कुटुंबाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या कुटुंबाने आर्थिक उन्नतीसाठी फक्त २८ गुंठे जागेत खेकडापालन, बोकड, गावरान कोंबडी, सेंद्रिय शेती (Crab farming, Buck, Organic farming) असे अनेक उद्योग उभारले आहेत. यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; आज होणार सुनावणी
संदीप शंकर गव्हाणे (Sandeep Shankar Gavane) या 36 वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच खेकडापालन करून एक वेगळा संदेश दिलाय. सध्या याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
लोकशाहीवर भाषण देणारा चिमुरडा देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज
खेकडा जेवणाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र खेकडा सहजासहजी हॉटेलमध्ये खाण्यास उपलब्ध नसतो. त्याचबरोबर गावरान कोंबडी आणि बोकडाचे ताजे मटण हे देखील आता लवकर मिळत नाही. हाच विचार मनात करून बारामतीतील या युवकाला खेकडा पालनाची कल्पना सुचली.
धक्कादायक! पुण्यात कोयता गॅंगने शाळकरी मुलावर केला कोयत्याने हल्ला