सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Culture Minister Sudhir Mungantiwar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (Cabinet meetings) याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अरे बापरे! भारत जोडो यात्रेत राहुल गांधी चालले ‘तब्बल’ इतके किलोमीटर
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE या ट्विटर अकाऊंटवरून राज्यगीताबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ट्विट करत लिहिण्यात आले आहे की, “#मंत्रिमंडळनिर्णय महाराष्ट्राला मिळाले #राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे.”
#मंत्रिमंडळनिर्णय
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) January 31, 2023
महाराष्ट्राला मिळाले #राज्यगीत. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. #म
पुणेरी रिलस्टार अथर्व सुदामे अडकला लग्नबंधनात; सेलेब्रिटींनीही दिल्या शुभेच्छा!