मागील काही दिवसांपूर्वी राज्यसरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती. आजही राज्यात अशा भरपूर शाळा आहेत ज्या ठिकाणी अगदी कमी पटसंख्या आहे. वाशीम जिल्ह्यातील ( Washim) एका शाळेत तर चक्क एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलाला शिकवायला देखील फक्त एकच शिक्षक आहे.
व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वात बेस्ट ठिकाणे
एवढी कमी पटसंख्या असलेली ही राज्यातील एकमेव शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंत वर्गखोल्या आहेत. गणेशपूर धानोरा या गावात ही जिल्हा परिषद शाळा ( ZP School) आहे. इथल्या तिसऱ्या इयत्तेत कार्तिक बंडू शेगोकार हा एकमेव विद्यार्थी शिक्षण घेत आहे. एकच विद्यार्थी व एकच शिक्षक असूनही ही शाळा सुरू आहे, यामुळे या शाळेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
अन् आजी लागल्या रडू! संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
गणेशपूर धानोरा या गावात मुळात लोकसंख्या फार कमी आहे. येथे फक्त 32 घरे असून 150 लोकसंख्या आहे. तसेच या गावात फक्त 4 विद्यार्थी शिक्षण घेणारे आहेत. ज्यामधील तीन विद्यार्थी कारंजा येथे शिक्षण घेत आहे. कार्तिकची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे तो गावातीलच शाळेत शिक्षण घेत आहे. सरकारी नियमानुसार पटसंख्या कमी असली तरी ही शाळा बंद करता येत नाही व विद्यार्थी देखील स्थलांतरित करता येत नाहीत. यामुळे एक विद्यार्थी व एक शिक्षक असूनदेखील ही शाळा सुरू आहे.
“तुम्हाला उपवास करूनही चांगली बायको मिळणार नाही” – गोपीचंद पडळकर