उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. फॅशन म्हणून उर्फी कधी काय करेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. सध्या उर्फीने असाच एक नवीन लूक केला आहे. तिचा नवीन लूक पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहे.
‘या’ अख्ख्या शाळेत फक्त एक शिक्षक आणि एक विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा
उर्फीच्या नवीन लुकचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने आता जीन्सपासून ड्रेस बनवला आहे. यामध्ये तिने पायात नाही तर चक्क हातात जीन्स घालत उर्फीने फॅशन केली आहे. आता उर्फीच्या या फॅशनवर काही लोक तीच कौतुक करत आहेत तर काही लोक तिला नेहमीप्रमाणे ट्रोल करत आहेत.
नागराज मंजुळेंनी सांगितला पहिल्या मजेशीर किस्सा, म्हणाले…
instantbollywood या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आता मुलींना देखील माहीत झालं जीन्स फक्त पायात घालता येत नाही”, तर दुसऱ्याने लिहिले की, “पॅण्टचा टॉप वाह उर्फी”, अशा अनेक वेगेवगेळ्या कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.