‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले आहे. मागील 14 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मागील काही महिन्यांपासून ही मालिका संपणार असल्याची चर्चा रंगली आहे. या मालिकेतील कलाकार देखील दिवसेंदिवस ही मालिका सोडत आहेत.
नागराज मंजुळेंनी सांगितला पहिल्या मजेशीर किस्सा, म्हणाले…
तारक मेहता हे या मालिकेतील एक महत्त्वाचे पात्र आहे. चाहत्यांना देखील हे पात्र विशेष आवडते. शैलेश लोढा हे मागील 14 वर्षे ‘तारक मेहता’ हे पात्र साकारत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांनी या मालिकेला राम राम ठोकला. मालिकेच्या निर्मत्यांसोबत काही वाद झाल्याने त्यांनी ही मालिका सोडली. यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता.
गायीच्या दुधात पुन्हा एकदा दरवाढ; पाहा काय आहेत नवीन दर
याबाबत आणखी एक नवीन माहिती समोर येत आहे. शैलेश लोढा ( Shailesh Lodha) यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ही मालिका सोडून सात महिने झाले आहेत. तरीदेखील त्यांना अजूनही त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार शैलेश लोढा यांचे मागील एक वर्षापासूनचे पैसे अजून अडकले आहेत. याकडे निर्माते देखील कानाडोळा करत आहेत.
हा तर नवीनच नखरा! उर्फीने पायात नाही तर हातात घातली जीन्स; पाहा VIDEO