एका रेड्याची किंमत किती असू शकते ? फार फार तर लाखात ! मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, कोल्हापूर येथे चक्क कोटींच्या किंमतीची रेडा ( Expensive Animal) पहायला मिळाला. या रेड्याची किंमत एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 कोटी इतकी आहे. या रेड्याची किंमत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील शैलेश लोढा कलाकाराचे पैसे अडकले! निर्मात्यांनी फिरवली पाठ
कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडवर भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मुऱ्हा जातीचा रेडा पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. इतकंच नाही तर 31 लीटर दूध देणारी या रेड्याची बहीण बिजलीला पाहण्यासाठी देखील लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत.
गायीच्या दुधात पुन्हा एकदा दरवाढ; पाहा काय आहेत नवीन दर
हा रेडा हरियाणा ( Hariyana) येथील प्रदीपसिंग चौधरी यांच्या मालकीचा आहे. प्रदीपसिंग यांच्या घरी 25 जनावरांचा मोठा गोठा आहे. त्यातील बादशहा हा रेडा विशेष प्रसिध्द आहे. या रेड्याने तीन वेळा नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली आहे. जगातील सर्वात मोठा रेडा म्हणून या रेड्याची ओळख आहे.
हा तर नवीनच नखरा! उर्फीने पायात नाही तर हातात घातली जीन्स; पाहा VIDEO
या रेड्याच्या वीर्यामुळे त्यांची एवढी मोठी किंमत आहे. सरकारी नियमानुसार दहा वर्षात या रेड्याकडून 12 कोटी रुपयांपर्यंतची वीर्य विक्री होऊ शकते. हा रेडा चार वर्षांचा असून त्याचे वजन 1100 किलो आहे. फक्त कोल्हापूरातच नाही तर संपूर्ण देशात या रेड्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
‘या’ अख्ख्या शाळेत फक्त एक शिक्षक आणि एक विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा