अभिनेत्री राखी सावंत ( Rakhi Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिगबॉस मराठी मधून बाहेर पडल्यापासून राखी एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देत आहे. एकीकडे तिची आई गंभीर आजाराने त्रस्त होती. तर दुसरीकडे तिचे लग्न धोक्यात आले आहे. ब्रेन ट्युमर व कॅन्सर सारख्या आजारांनी नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले. दरम्यान राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने धक्कादायक माहिती दिली आहे.
अर्थसंकल्प सादर होताच विवेक अग्निहोत्रींची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडत असून तिने आपले लग्न धोक्यात असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर ती तीव्र नैराश्यात असल्याचे देखील राखीने सांगितले आहे. पापाराझींनी नुकतेच राखी सावंतला मुंबई येथे पाहिले होते. यावेळी ती म्हणाली की, ” माझे लग्न धोक्यात आहे. मला माझे लग्न ( Marriage) वाचवायचे आहे. माझ्यावर अत्याचार करू नका, देवा मला मारून टाक” इतकंच नाही तर या व्हिडीओ मध्ये राखी सावंत जोरजोरात किंचाळत आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा; मात्र पीएम किसान योजनेची रक्कम वाढली का? जाणून घ्या सविस्तर
राखीने काही दिवसांपूर्वी आपला बॉयफ्रेंड आदिल खान ( Adil Khan) यांच्यासोबत कोर्टात लग्न केले. यावेळी लग्नानंतर तिने आपला धर्म बदलून फातिमा असे नाव ठेवले. सुरुवातीच्या काळात आदिल खान आपल्या लग्नावर व कोर्टमॅरेज वर मौन बाळगून होता. परंतु, काही दिवसांनी आदिल खानने देखील या लग्नाला होकार दिला होता.
“कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा”, कोयता गँगला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची फिल्डिंग