शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावी बारावीच्या परीक्षा समजल्या जातात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
अर्थसंकल्प जाहिर होताच अंबादास दानवेंनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”
दहावी आणि बारावीच्या ( SSC & HSC) लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता व दुपारच्या सत्रात 3 वाजता हे पेपर होणार आहेत. यावेळी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.
ऊसतोड मजूर नवरा-बायको रातोरात इंस्टाग्रामवर झाले स्टार; मात्र प्रसिद्धीमुळे ओढवलं संकटं
दरम्यान आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना 10 मिनिटे उशीर झाला असला, तरी पेपरला बसता येत होते. मात्र बरेचसे विद्यार्थी याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून बोर्डाच्या निदर्शनास आले. यामुळे बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.
जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? ‘त्या’ एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने ( State Board) उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत.यामुळे आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता परिक्षेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील राज्य मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.
महाराष्ट्रात प्रथमच महिला एसटी चालवणार! प्रशिक्षण आले अंतिम टप्प्यात
उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन काही विद्यार्थी लेखी परीक्षेस उशिरा येत होते. मात्र या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत दखल घेत मंडळाने कारवाई केली होती. परंतु, यांसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्रात प्रथमच महिला एसटी चालवणार! प्रशिक्षण आले अंतिम टप्प्यात