मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्राची हास्यजत्रा (Comedy fair of Maharashtra) फेम वनिता खरातच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अखेर काल २ फेब्रुवारीला वनिता खरात आणि सुमित लोंढे यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला हास्यजत्रेतील अनेक कलाकार उपस्थित होते.
मागच्या काही दिवसापूर्वी वनिताच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. वनिताला पारंपारिक दागिने खुप आवडत असून लग्नातही तिने पारंपारिक दागिने परिधान केल्याचे दिसत आहे.
सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर त्यांच्या मुलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझे बाबा फार…”
वनिताला हे दागिने प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) भेट दिले आहेत. प्राजक्ताने नुकताच प्राजक्तराज नावाचा आपला ब्रँड सुरु केला असून ते दागिने प्राजक्ताने वनिताला भेट दिले आहेत. आता वनिताला चाहते लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
मोठी बातमी! सत्यजीत तांबेंचा विक्रमी मतांनी विजय
दरम्यान, वनिता आणि सुमीतची (Vanitha and Sumit) भेट लॉकडाऊनमध्ये झाली होती. नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
बाबा रामदेव पुन्हा बरळले, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी केले वादग्रस्त विधान