पुणे शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची ( Koyta Gang) दहशत वाढताना दिसत आहे. या गँगने मागील काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान या टोळक्यातील काही मुलांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे तर काही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवले होते. मात्र बालसुधारगृहात असणारे 8 सदस्य पुण्यातील येरवडा ( Yerwada)येथून पळून गेले आहेत. या कोयता गँगला पकडण्यासाठी आता पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात; पाहा PHOTO
कोयता गँगला पकडण्यासाठी पोलिसांनी रोख रकमेची बक्षिसे देखील जाहीर केली आहेत. अशातच या गँगला पकडण्यासाठी व त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी एक भलतीच शक्कल लढवली आहे. पुणे पोलिसांनी आता एक नवीन नियम काढला आहे. यामध्ये पुण्यात कोणी कोयता खरेदी करत असेल तर त्याला आधी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे.
सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर त्यांच्या मुलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझे बाबा फार…”
यामुळे इथून पुढे कोयता विक्रेत्यांना देखील सतर्क रहावे लागणार आहे. कोयते घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डची एक प्रत या विक्रेत्यांना घ्यावी लागणार आहे. कोयता गँग पुण्यात कोयत्याच्या तालावर लोकांमध्ये दहशत पसरवत आहे. या हत्याराचा वाढता चुकीचा वापर पाहून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.