अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Independent candidate Shubhangi Patil) यांचा पराभव करत नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. कॉंग्रेस कडून निलंबन झाल्यानंतर सत्यजित तांबेंचा झालेला हा विजय संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिला आहे. दरम्यान, शुभांगी पाटील यांनी परभावनांतर प्रतिक्रिया दिली आहे.
6 फेब्रुवारीपासून मिळणार दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट
शुभांगी पाटील म्हणाल्या, “एका सामान्य घरातील लेकीला ४० हजार मते पडणे ही देखील खूप मोठी बाब आहे. जशी झाशीची राणी लढली, तसं मला लढायचंय शिवसेनेला मी कधीच सोडणार नाही,” अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली आहे. त्या नाशिकमध्ये बोलत होत्या.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी धोक्यात?
दरम्यान, नाशिक विभागामध्ये एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती. यानंतर काल त्याची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली असून त्यांचा पराभव झाला.
ब्रेकिंग! रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाच्या संवाद लेखकाचा भीषण अपघात