मुंबई : अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) आईबाबा होणार असल्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच दिवसांपासून चालू आहेत. एवढ्या दिवस फक्त चर्चा चालू होत्या पण आता या चर्चाना पूर्णविराम लागलाय. बिपाशाने सोशल मीडियावर गरोदरपणातील फोटो शेअर करत आई होणार असल्याचं सांगितलं आहे.
बिपाशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून पती करणबरोबर खास फोटोशूट केलेले फोट शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आपल्या जीवनाच्या प्रिझममध्ये आणखी एक अनोखी छटा जोडतो. आम्हाला पूर्वीपेक्षा थोडे अधिक संपूर्ण बनवत आहे. आम्ही या आयुष्याची सुरुवात वैयक्तिकरित्या केली आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही दोघे होतो. फक्त दोघांवर खूप प्रेम, हे बघायला आम्हाला थोडं अयोग्य वाटलं… आता लवकरच, आम्ही जे दोन होतो ते आता तीन होऊ. आपल्या प्रेमातून प्रकट झालेली सृष्टी, आपलं बाळ लवकरच आपल्यात सामील होईल आणि आपला आनंद वाढवेल.
पुढे तिने लिहिले की, तुमच्या सर्वांचे आभार, तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल ते जसे आहेत आणि नेहमीच आमचा भाग असतील. आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल आणि आमच्याबरोबर आणखी एक सुंदर जीवन प्रकट केल्याबद्दल धन्यवाद,
बिपाशाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.