अजित पवार यांच्यावर टीका करण्याऱ्या पडळकरांना जितेंद्र आव्हाडांचे उत्तर, म्हणाले…

Jitendra Awada's reply to Padalkars criticizing Ajit Pawar, said...

मागच्या काही दिवसांपूर्वी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, अजित पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी एकदम खालच्या पातळीची भाषा वापरली आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!

मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असती. माध्यमांनी नेमकी खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं असं गोपीचंद पडळकर यांनी म्हंटल आहे. आता यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत; जयंत पाटील म्हणाले, “आज उमेदवार जाहीर….”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी मी सहमत आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. तुमच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे”. अशा शब्दात आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते

ब्रेकिंग! अखिलेश यादवांच्या ताफ्याला भीषण अपघात; चार जणांची प्रकृती गंभीर

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपसह शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता हा वाद थांबला होता. परंतु यामध्येच आता गोपीचंद पडळकरांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना एकदम खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रीपद पदरात पडले नाही; अजित पवारांचा खुलासा!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *