राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) हा एक आघाडीचा पक्ष मानला जातो. मात्र आजपर्यंत या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. जेष्ठ नेते शरद पवारांपासून युवा नेते रोहित पवारांपर्यंत अनेक नावाजलेले नेते या पक्षात आहेत. मात्र तरीदेखील या पक्षातील कुठल्याही नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडलेली नाही. यावरून अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधकांकडून डिवचले देखील जाते. अजित पवारांनी २००४ च्या विधानसभा निवडणूकीवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी एकप्रकारे असे बोलून दाखवले आहे की, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतलेला निर्णय चुकलेला आहे.
रोहित पवार यांना आवरला नाही हुरडा खायचा मोह; म्हणाले, “थंडी आणि हुरडा हे एक..”
दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत एक मोठे व महत्त्वाचे विधान केले आहे. खरंतर राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाच्या ‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रिपद पदरात पडले नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला आहे.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना समाज द्यावी” – सचिन खरात
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. मात्र त्यावेळी हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी पक्षाने घालवून मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले होते. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी चूक होती. त्यावेळी कोणालाही मुख्यमंत्री केले असते तरी चालते असते, असे अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले आहेत. राजकीय कारकिर्दीत कोणत्या चुका झाल्या नसत्या तर बरं झालं असतं ? असा प्रश्न मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अजित पवारांनी हा खुलासा केला आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करण्याऱ्या पडळकरांना जितेंद्र आव्हाडांचे उत्तर, म्हणाले…