मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय!

Eknath Shinde took a big decision regarding Maratha reservation!

मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा रखडला आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यामध्ये लक्ष घातले असून याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण एकजुटीने लढू. काहीही करून मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे.’ अशी आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सांगितले आहे.

मोठी बातमी! अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला भीषण अपघात

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Marath Reservation) न्यायालयीन लढा सुरूच राहील. यावेळी मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रबळपणे मांडण्यासाठी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला जाईल. मराठा समाजाला ओबीसी प्रमाणेच सर्व सवलती आणि सुविधा देण्यात येतील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

तुम्ही बंडखोरी करताना कोणाला सांगितलं? राम शिंदे यांचा अजित पवारांना सवाल

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी जे करावे लागेल ते सरकार करेल. यासाठी सहकार्य देऊ इच्छिणाऱ्यांना देखील सोबत घेतले जाईल. सरकार आरक्षण मिळावे याच भूमिकेचे आहे. असे यावेळी सांगण्यात आले.

“…म्हणून सत्यजित तांबेंची चौकशी व्हावी”, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने केली मागणी

आम्ही आंदोलकांच्या सोबतच आहोत. मराठा आरक्षणाला धरून त्यांची जी भावना आहे, तीच आमची भावना आहे. मराठा समाजातील तरुणांना रोजगार, स्वयंरोजगार, उच्च शिक्षणाची संधी मिळेल यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक तसेच एकंदर सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *