
दूध हे शरीरासाठी पौष्टिक असते. यासाठी आहारात दुधाचा समावेश आवश्यक असतो. मात्र सामान्य लोकांसाठी दूध खरेदी करणे दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. पुणे जिल्हा दूध उत्पादन संघ व अमूल पाठोपाठ आता पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड ( मिल्कफेड) या कंपनीने दुधाच्या किंमतीत वाढ (Milk rates increased) केली आहे. मिल्कफेड ने प्रतिलिटर दुध दरात तीन रुपयांनी वाढ केली आहे. कालपासून दि.4) ही वाढीव किंमत लागू करण्यात आली आहे.
चिंचवड-कसबा पोटनिवडणुक महाविकास आघाडी लढवणार आणि जिंकणारही, संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत
मिल्कफेडचे 57 रुपये प्रतिलिटर दर असलेले दूध आता 60 रुपये प्रतिलिटर झाले आहे. फुल क्रीम दूधाची किंमत देखील प्रतिलिटर सहा रुपयांनी वाढली आहे. तसेच पूर्वी 51 रुपये प्रतिलिटर असणारे टोन्ड दूध आता 54 रुपयांना विकले जाणार आहे. इतकंच नाही तर डबल टोनिंग दुधाच्या 500 मिली पॅकची किंमत 23 रुपयांवरून 24 रुपये आणि 6 लिटर पॅकची किंमत 258 रुपयांवरून 273 रुपये इतकी करण्यात आली आहे.
“आता तरी बालिशपणा सोडा”, राम शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका
या महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाने दुधाच्या किंमतीमध्ये वाढ जाहीर केली होती. प्रतिलिटर दोन रुपयांनी ही वाढ करण्यात आली होती. या पाठोपाठ भारतातील प्रमुख दूध उत्पादक कंपनी अमूलने (Amul) देखील दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ केली. यानंतर लगेच मिल्कफेडने सुद्धा दुधाच्या किंमती वाढवल्या. यामुळे सामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागत असून त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
चिंचवड-कसबा पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांना फोन, चर्चांना उधाण