प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तन सुरू असताना कोणावर विधान करतील सांगता येत नाही. मात्र आज चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदुरीकर महाराजांवरच विधान केले. यावेळी उपस्थितांमध्ये देखील मोठा हशा पिकला.
कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्ती महाराज इंदोरीकर व राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवारांनी हे विधान केले आहे.
मोठी बातमी! सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ
“जनमाणसांत सहजपणाने चांगले संस्कार देण्याचे काम निवृत्ती महाराज ( Nivrutti Maharaj Indurikar) करतात. मात्र मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण, मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही. मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो. ” असे शरद पवार यांनी म्हणताच कार्यक्रमात उपस्थित लोकांनी लोट पोट होऊन हसायला सुरुवात केली.
उर्फी जावेदच्या कपडद्याबद्दल अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या…
याशिवाय ” मला निवृत्ती महाराज यांचे कीर्तन ऐकण्याची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये अनेक गमती असतात. खूपदा त्यांचे कीर्तन मी टीव्हीवर पाहत असतो. त्यांची अॅक्शन काय, त्यांची दिशा काय, मी त्यांच्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगत नाही. ” असे म्हणत शरद पवारांनी इंदुरीकर महाराज यांचे कौतुक केले आहे.
चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात अजित पवार यांचे मोठे विधान; म्हणाले…