भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांनी क्रिकेट जगताबद्दल मोठे विधान केले आहे. अगामी काळात आयपीएलला मोठा फटका बसू शकतो. असे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. ‘इंटरनॅशनल क्रिकेटपेक्षा टी-20 लीग स्पर्धेला खेळाडूंची पसंती फार काळ टिकणार नाही.’ असे गांगुली यांनी म्हंटले आहे.
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…”, राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
भविष्यातील आर्थिक गणिते पाहता, जगात काही मोजक्याच क्रिकेट लीग स्पर्धांचे आयोजन केले जाईल. मात्र क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू क्रिकेट लीग स्पर्धेऐवजी देशासाठी खेळण्याला अधिक प्राधान्य देतील. जगात बिग बॅश लीग नंतर यूएई आणि दक्षिण आफ्रिकेत लीग होणार आहे. तसेच अमेरिका देखील लीग स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी करत आहे.
टिळक कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांचे फोन वर फोन; म्हणाले, “सांभाळून घ्या आणि …”
सध्या खेळाडू नव्याने सुरू होणाऱ्या लीग स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र अगामी काळात त्यांना कशाला प्राधान्य द्यायचे ते समजेल. त्यामुळे ते देशासाठी इतर क्रिकेट लीग स्पर्धांचा त्याग करतील. यामुळे येत्या 4-5 वर्षात काही मोजक्याच लीग सुरू राहतील. परंतु, त्या कोणत्या? हे मला सांगता येणार नाही. असे भाकीत सौरव गांगुली यांनी केले आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला देणार विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, “मला मूर्ख…”
मी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच आयसीसी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी मी पाहिले आहे की, “कोणत्याही मदत आणि भक्कम पायाशिवाय क्रिकेट नाही.” असे देखील सौरव गांगुलींनी यावेळी सांगितले आहे.
राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिलने मला लाथेने मारलं…”