सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून (Kasba and Chinchwad elections) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
‘या’ स्पर्धांना क्रिकेटर्सची पसंती टिकणार नाही; आयपीएल सुद्धा होणार बंद?
जयंत पाटील यांनी ट्विट करत लिहिले की, “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.”
टिळक कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांचे फोन वर फोन; म्हणाले, “सांभाळून घ्या आणि …”
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
अजित पवार (Ajit Pawar) काही वेळामधेच चिंचवडमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीमध्ये नाना काटे (Nana Kate) आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला देणार विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, “मला मूर्ख…”
दरम्यान, आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी च्या शेवटच्या आठवड्यात 26 तारखेला कसबा पोटनिवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…”, राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा