मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत म्हणाली आहे. दरम्यान आता राखीने त्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार आदिल खानच्याच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असे आहे.
ब्रेकिंग! राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी!
दरम्यान, राखी बिगबॉस मराठी मधून बाहेर पडल्यापासून राखी एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देत आहे. एकीकडे तिची आई गंभीर आजाराने त्रस्त होती. तर दुसरीकडे तिचे लग्न धोक्यात आले आहे. ब्रेन ट्युमर व कॅन्सर सारख्या आजारांनी नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले आहे.
‘या’ स्पर्धांना क्रिकेटर्सची पसंती टिकणार नाही; आयपीएल सुद्धा होणार बंद?
आईच्या निधनाबाबत राखीने अदिलखानवर गंभीर आरोप केले आहेत. राखी म्हणाली, “आदिलमुळे माझी आई जिवंत नाही, आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. जर माझ्या आईवर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.
टिळक कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांचे फोन वर फोन; म्हणाले, “सांभाळून घ्या आणि …”