छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Aavhad) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘औरंगजेब, अफझलखान आणि शाहिस्तेखान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत.’ असे ते म्हणाले होते. या विरोधात भाजप नेते आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाने पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांवर ट्वीटद्वारे टीकास्र सोडले आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे करणार बंडखोरी
भाजपने जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जितेंद्र आव्हाड सारख्या विकृती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या होत्या. स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर विचारधाराच काय, प्रसंगी धर्मांतर करून औरंगजेब वारस मीच आहे सांगण्यात देखील कमी करणार नाहीत.” असे ट्विट भाजपने केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही @Awhadspeaks सारख्या विकृती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या होत्या. स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर विचारधाराच काय, प्रसंगी धर्मांतर करून औरंगजेब वारस मीच आहे सांगण्यात देखील कमी करणार नाहीत.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 7, 2023
1/7 pic.twitter.com/FOje0uWXJN
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोले यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
नेमकं काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
महाराष्ट्र सन्मान परिषदेमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी ते म्हणाले होते की एमपीएसीच्या अभ्यासक्रमामधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला आहे. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितले की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब, अफजलखान आणि शायिस्तेखान आहेत. म्हणून, शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवत होते हे जगासमोर आहे.
काँग्रेससाठी धक्कदायक बातमी! बाळासाहेब थोरात यांनी दिला राजीनामा