सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातलाय.
आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानांवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी छोटे मोठे…”
महालगाव (Mahalgaon) येथे काल आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक या दोन्ही गोष्टी एकाचवेळी झाल्या यामुळे रमाईंचा कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यामुळे डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थ आणि कियाराचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा; पाहा PHOTO
महालगाव या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम चालू असताना त्याच्याच बाजूला रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. आदित्य ठाकरे यांची सभा सुरु असल्याने रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेला डीजे आणि मिरवणूक थांबवण्याची विनंती पोलिसांनी भीमसैनिकांना केली. यावेळी भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने किरकोळ दगड स्टेजवर फेकल्याची माहिती समोर आली आहे.
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत!