
‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale of ‘Bigg Boss’ fame) त्याच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सध्या अभिजित बिचुकले याला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. आता याबाबत अभिजित बिचुकले याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार देखील दाखल केली आहे.
‘धडाकेबाज’ चित्रपटातील कवट्या महाकाल माहिती आहे का? पाहा मास्कमागचा खरा चेहरा
कसबा विधानसभा मतदारसंघातून याने अर्ज दाखल केला होता. दरम्यान हा अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अभिजित बिचुकले याने तक्रारीत देखील उल्लेख केला आहे. धमकीच्या फोन नंतर संरक्षण देण्याची मागणी अभिजित बिचुकले याने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक
तक्रार दाखल करत बिचुकले याने लिहिले की, “मी कसबा मतदार संघातून अपक्ष अर्ज केला यांनतर मला विरोधकांकडून अर्ज मागे घ्यावा त्याचबरोबर पुणे सोडून साताऱ्याला जावं आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचा खून करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे”. आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अभिजित बिचुकले याने केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानांवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी छोटे मोठे…