राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोकठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. ते कायम वेगेवेगळ्या मुद्यांवर भाष्य करत असतात. सध्या महाराष्ट्रात लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स केले जातात. मागच्या काही दिवसापूर्वी गौतमी पाटीलने देखील अश्लील हावभाव करत लावणी केली होती. त्यांनतर हा विषय चांगलाच चर्चेत आला होता.
“…अन् शेतकरी आजोबांनी इंग्रजी मधून बोलायला सुरुवात केली”, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
आता अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर (Lavani dance programs) भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू, असा इशारा देखील राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
“…अन् शेतकरी आजोबांनी इंग्रजी मधून बोलायला सुरुवात केली”, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
त्याचबरोबर अजित पवार म्हणाले, जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अश्लील नृत्याचे कार्यक्रम आयोजित होत असतील त्यांना देखील सूचना दिल्या जातील असं अजित पवार म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.