नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून हे वाद वाढत गेले. दरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat) यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धनुष्यबाण व शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसानिमित्त फोन केला होता. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) शुभेच्छा देत बाळासाहेबांना राजीनाम्याबद्दल विचारले. यावर ते म्हणाले की, “तो माझा पक्षांतर्गत प्रश्न आहे. मी पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा निर्णय घेईल.”
देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
तसेच विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये मोठे राजकारण झाले आहे. सत्यजीत तांबे या निवडणूकीत विजयी झाले. मात्र जे राजकारण झालं ते व्यथित करणारं होतं. याबाबतची माझी भूमिका मी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. त्यामुळे यावर बाहेर काही बोललं पाहिजे या मताचा मी नाही. याबाबतचा योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे देखील बाळासाहेब थोरात अजित पवारांना म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, आज होणार चक्का जाम आंदोलन