सध्या राखी सावंत सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर (Adil Khan) गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली आहे. दरम्यान राखीने आदिल खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता राखीच्या तक्रारीची दखल मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी घेतली असून आदिलला ताब्यात घेतलं आहे.
अजित पवारांचा मोठा खुलासा; राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरत फोनवर म्हणाले की…
काल आदिलला कोर्टात हजर करण्यात आले आहे. आदिल दुर्रानीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. viralbhayani या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहताच आपल्या लक्षात येते की, राखीचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी कोर्टात हजर केलं आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आदिल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, आज होणार चक्का जाम आंदोलन
आता राखीचा देखील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे की, “मी वैद्यकीय तपासणीसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये जात आहे. माझ्या शरीरावर कुठे कुठे जखमा आहेत याबाबत तपासणी केली जाईल, आदिलने मला कसा त्रास दिला आहे हे सर्व मी डॉक्टरांना सांगणार आहे. असं राखी म्हणत आहे”.