मद्यपान ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. कुटुंबातील काही कुटुंबप्रमुख लोक दररोज मद्यपान करत असतात. यामुळे कुटुंबातील लोक देखील वैतागतात. मद्यपानामुळे काही लोक जीवाला देखील मुकतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादमधून समोर आली आहे. मद्यपी बापाला कंटाळून दोघा मुलांनी आपल्याच जन्मदात्या बापाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश
औरंगाबादमधील वैजापूर (Vaijapur in Aurangabad) तालुक्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. वडील दररोज दारू पिऊन घरी यायचे. रोज त्याच त्याच गोष्टी यामुळे रोजच्या त्रासाला कंटाळून दोन्ही मुलांनी दारुड्या बापाची हत्या केली.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसबा, चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदेतज्ज्ञांनी केलं मोठं विधान
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा या मुलांनी गजाने आणि काठीने मारहाण करून बापाची हत्या केली. आणि त्यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी दोन भावाविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांना अजून एक मोठा धक्का!