सध्या राखी सावंत आणि आदिल खान ( Rakhi Sawant and Adil Khan) यांच्यात झालेल्या वादामुळे ते दोघे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत राखीने त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यांनतर आदीलला पोलिसांनी ताब्यात घेतले व काल त्याची चौकशी होऊन आता आदीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्येच आता राखीने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक रील शेअर केली आहे.
आता ‘काठी’ ऐवजी पिस्तूल, कोयता गँगचा बंदोबस्त होणार; पोलीस प्रशासनाने उचलली ठोस पाऊले
या व्हिडीओमध्ये “माझ्या जवळच्या लोकांनी मला एकटं पाडलं, त्यामुळे नक्की माझं नशीब वाईट आहे की मी, हेच मला समजत नाही,” अशा ओळी आहेत. या ओळींवर राखी सावंत लिपसिंग करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे जीवितहानी; मृत्यूची संख्या नऊ हजारांवर
नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या कमेंट देखील करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की ” तू चांगली आहेस, फक्त तुझं नशीब खराब आहे’, ‘मात्र हिंमत ठेव, सगळं ठिक होईल’, अशा कमेंट नेटकरी या व्हिडिओवर करत आहेत.