Mahavikas Aghadi : “आले रे आले, गद्दार आले…”, अशी घोषणा करत विरोधकांचं सरकारविरोधात आंदोलन

The opposition protested against the government, proclaiming "Aale Re Aale, Gaddar Aale..."

मुंबई : राज्यसरकार विरोधात विरोधकांनी विधानभवनासमोर आंदोलन केले आहे . यावेळी या आंदोलनामध्ये राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. सरकार येऊन ४५ दिवस झाले तरीही अजून कोणतेच निर्णय झाले नाहीत. कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होतोय. राज्यामध्ये पूरपरिस्थिती आहे. ओला दुष्काळ (Flood) जाहीर करावा, अशा वेगवेगळ्या मागण्या राज्य सरकारकडे करत आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले, गद्दार आले, 50 खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांचा आवाज विधिमंडळाच्या परिसरात घुमत होता. विरोधक जोरदार घोषणा करत होते. खातेवाटप झाली असून त्यातदेखील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे चालू आहेत. यावरून देखील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

खातेवाटपावरून गोंधळ –

केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर राज्य सरकारकडून होत आहे. राज्यामध्ये पूरस्थिती, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण सरकारमधील आमदार मात्र खाते वाटपावरून नाराज आहेत. राज्यातील समस्या त्यांना दिसत नाहीत, असा आरोपदेखील करण्यात आला आहे.

राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असे ट्विट करत अजित पवारांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *