पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
माध्यमांशी बोलताना ढसाढसा रडत राखी सावंत म्हणाली; “मैं एक जिंदा लाश हूं”
आता पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरणार आहेत. ते 18 आणि 19 फेब्रुवारीला दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यावेळी अमित शाह विविध कार्यक्रमांनादेखील उपस्थित राहणार आहेत.
प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची आई ढसाढसा रडत म्हणाली, “आमचा मुलगा रोज…”
दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. दरम्यान, आजपासून प्रचाराची खरी रणधुमाळी सुरु होणार आहे. कारण आज सर्व पक्षातील दिग्गज नेते प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
आदिल तुरुंगात जाताच राखी सावंतने शेअर केली रील; म्हणाली, “नक्की माझं नशीब…”