मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी मांडला अनोखा थाट; वऱ्हाडी आणले चक्क बैलगाडीमधून!

Father presented a unique look for his daughter's marriage; The bridegroom was brought from a bullock cart!

मुलीचे लग्न हा प्रत्येक बापासाठी महत्त्वाचा सोहळा असतो. हा सोहळा आठवणीत राहण्यासारखा थाटामाटात व्हावा यासाठी मुलीचे वडील प्रयत्नशील असतात. आपल्या मुलीच्या लग्नात काहीच कमी पडू नये, यासाठी ते आयुष्यभराची जमापुंजी देखील खर्च करतात. पाथर्डी (Pathardi) येथे देखील एका वडिलांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने आपल्या मुलीचे लग्न (Unique Marriage) लावून दिले आहे. तुम्ही वाचून थक्क व्हाल परंतु, या लग्नासाठी चक्क बैलगाडी मधून वऱ्हाडी आले होते.

“नोकरीच काहीतरी जुगाड करुन द्या, नाही तर मी पळून जाईल”, तरूणीचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे देवेंद्र भवर आणि पल्लवी गाडेकर यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी २० बैलगाड्यातून वऱ्हाडी मंडळी आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या अनोख्या लग्नात डीजेचा आवाज न करता टाळ मृदूंगाचा नाद करत वारकरी वऱ्हाडाच्या रूपाने दाखल झाले होते.

महावितरण अधिकाऱ्याशी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला मीटर!

वारकरी परंपरा जपत हे लग्न पार पडले आहे. सनईचे सप्तसूर, डोईवर तुळस घेऊन चाललेल्या महिला आणि थेट हातात वीणा घेतलेला नवरदेव असा अस्सल वारकरी थाट या लग्नात होता. एवढंच नाही तर लग्नासाठी वराने संत तुकाराम महाराजांची वेशभूषा आणि वधूने जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती.

मोठी बातमी! आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा भीषण अपघात; १ जागीच ठार

वधू पल्लवी हिचे वडील वारकरी संप्रदायात असून ते कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. आपल्या मुलीचे लग्न डीजे विरहित व्हावे. तसेच लग्नात वऱ्हाडींच्या गाड्यांमुळे प्रदूषण होऊ नये. यासाठी त्यांनी अगदी अनोख्या पद्धतीने हा विवाह सोहळा आयोजित केला होता.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह उतरणार मैदानात!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *