युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. काल बिकडीन येथे शिवसंवाद मेळावा पार पडला. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण या महाराष्ट्राला सुर्वण वैभवी काळाकडे घेवून जात होतो. तेव्हा कृषी, उद्योग या राज्याच्या डबल इंजिनच्या सहाय्याने आपण शेतकरी, तरुणांना सुखी करण्याचे प्रयत्न करत होतो. मात्र हे काही लोकांना खूपत होतं. म्हणून त्यांनी आपल्यातील चाळीस जणांना गद्दारी करायला लावली. त्या गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या ( Uddhav Thackeray) पाठीत चाळीस वार करून आपले सरकार पाडले.
“मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल…”; अभिनेत्री उर्फी जावेदचे ट्विट चर्चेत
परंतु, फक्त दोन महिने त्रास सहन करा. आमचा देशाचे संविधान व न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हे सगळे गद्दार बाद होतील. यानंतर हे घटनाबाह्य सरकार कोसळेल असे आदीत्य ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे वाईन बार उघडत फिरत आहेत, त्यांना जास्त किंमत देऊ नका, असे आवाहन आदित्य ठाकरे ( Aaditya Thacekray) यांनी केले आहे.
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले
या राज्यातला शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या हाताला काम नाही. यामुळे ते हैराण आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमुक्ती दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर पीकांच्या नुकसान भरपाईपोटी मदतीची तरतूद अर्थसंकल्पात करून ठेवली. मात्र गद्दारांनी आपले सरकार पाडले आणि ते राहून गेले. यांनी पुन्हा तीच घोषणा केली परंतु, शेतकऱ्यांम अजूनही नुकसानभरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही.
महाविकास आघाडी सरकार पडण्यास नाना पटोलेच जबाबदार! शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट
तरुणाईच्या हाताला काम मिळावे यासाठी आम्ही मोठे उद्योग राज्यात आणले. मात्र यांनी ते गुजरातला भेट म्हणून दिले. फक्त काही दिवस त्रास सहन करा, पुन्हा राज्यात आपले सरकार येणार आहे. तेव्हा आपण पुन्हा राज्याला विकासाच्या मार्गावर घेवून जावू. असे म्हणत शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी मांडला अनोखा थाट; वऱ्हाडी आणले चक्क बैलगाडीमधून!