चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मविआ मध्ये राहुल कलाटे हे प्रबळ दावेदार उमेदवार असून देखील त्यांना डावलले गेले. यामुळे कलाटेंनी (Rahul Kalate) बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगून देखील राहुल कलाटे मागे हटत नाहीत; चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना बसू शकतो. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल ( ता.10) सचिन आहिरे ( Sachin Aahire) यांनी कलाटे यांची भेट घेऊन मन वळवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे व राहुल कलाटे यांचे फोनवर बोलणे करून दिले. परंतु, तरी सुद्धा राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही.
इंदापूर तालुक्यात चोरांची दहशत! शेतकऱ्याची लाखाभरांची शेळ्या-बोकडं केली लंपास
राहुल कलाटे यांनी पक्षप्रमुखांचे म्हणणे देखील ऐकून घेतले नाही. यामुळे त्यांची शिवसेनेतून हाकलपट्टी होऊ शकते. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. बंडखोर राहुल कलाटे यांचा शिवसेनेशी संबंध राहणार नाही. असे सचिन आहिरे म्हणाले आहेत. पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे कलाटे यांच्यावर लवकरच पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
सोलापूर लोकसभेच्या जागेवरून वातावरण पेटले! आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “कोण रोहित पवार?”