चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची लढत आता तिरंगी झाली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी मधील नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने ऐनवेळी नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे राहुल कलाटे नाराज झाले असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
महिलांच्या हाती कोयता पुणे असुरक्षित झाले का? वसंत मोरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
राहुल कलाटे ( Rahul Kalate) यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून प्रयत्न देखील करण्यात आले. शिवसेनेचे नेते राहुल आहिर यांनी कलाटे यांना भेटून समजून काढण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंना फोन लावून बोलणं देखील करून दिले. मात्र तरी देखील राहुल कलाटे मागे हटले नाहीत. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील सांगितले तरी देखील राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही.
“अजितदादांना मुख्यमंत्री करायचं”, आमदार निलेश लंके यांचे वक्तव्य चर्चेत
आता अर्ज मागे न घेण्याचं कारण कोणते हे देखील राहुल कलाटे यांनी सांगितलं आहे. राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडच्या जनतेने मला बळ दिलं आहे. मी लढावं असं येथील जनतेला वाटत आहे त्यामुळे त्यांना धुडकावून मी पुढे जाऊ शकत नाही. मी पुर्ण ताकदीने चिंचवडची निवडणूक लढणार आहे, अशा शब्दामध्ये राहुल कलाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “पंतप्रधानांची किंमत…”