मागच्या काही दिवसापासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा चालू होत्या. अनेकदा उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमांमध्ये जातील तिथे पंकजा मुंडे अनुपस्थित होत्या. यावरून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सर्वत्र होत्या. मात्र, पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज एकाच गाडीने एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का, अशी चर्चा रंगल्या आहेत.
“आदित्य ठाकरे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”, तानाजी सावंत यांचं मोठं विधान
नाशिकमध्ये शुक्रवारवापासून भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक सुरू झाली आहे. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्याचबरोबर या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. दरम्यान, पंकजा मुंडे आणि देवेद्र फडणवीस हे एकाच गाडीने आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानांतर्गत सरकारने स्वीकारले बालकांचे पालकत्व
दरम्यान, आजच्या या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.