
चित्रपट सृष्टीतील एक बहुआयामी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव (Saili Sanjeev) होय. सायलीने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमध्ये उत्तम कामगिरी करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केला आहे. सध्या सायली महाराष्ट्राची क्रश बनली आहे. पण सध्या सायली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
धक्कादायक! पोटच्या मुलाने केली चक्क आईवडीलांचीच हत्या
अभिनेत्री सायली आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचे एक वेगळंच नातं आहे. मनोरंजन विश्वात अशोक सराफ यांना प्रेमाने मामा म्हटलं जाते. तर अभिनेत्री सायली अशोक सराफ यांना वडिलांच्या समान मानते.
सायली म्हणते की, मी कधी विचारही केला नव्हता की मला अशोक सराफ यांच्यासोबत राहीला मिळेल. पण आता मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते. त्यामुळे मी स्वतःला खुप भाग्यवान समजते. इतकच नाही तर मी निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांना आई वडील मानते. सायलीने अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा
तसेच, मी माझ्या करिअरमध्ये जर का अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे नाव घेतलं नाही तर पुर्णत्वच येणार नाही. मी त्यांची मानलेली मुलगीच आहे. ते दोघंही माझी काहे दिया परदेस ही मालिका आवर्जून पाहायचे. आणि माझं काय चुकलं तर मला ते नेहमी फोन करून सांगतात, असेही सायली म्हणते.
VIDEO: पुन्हा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली उर्फी जावेद, फोटो पाहून खाजवाल
दरम्यान, सायली झिम्मा चित्रपटामध्ये दिसलेली. त्यानंतर एका पैठणीची या सिनेमात सायली पारंपरिक लुक मध्ये दिसतली होती. त्यात तिने अत्यंत सोज्वळ भूमिका साकारली आहे. तसेच सध्या सायली क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.