
मागच्या काही दिवसापुर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. यांनतर नवीन राज्यपाल कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. याबाबत अनेक चर्चा चालू होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे आता रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी बैस यांनी झारखंडचे राज्यपाल पदाचा कारभार सांभाळला आहे.
ब्रेकिंग! पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात, कंटेनरने दिली चार वाहनांना जोरदार धडक
नेमके कोण आहेत रमेश बैस?
मध्यप्रदेशातील रायपूरमध्ये रमेश बैस यांचा जन्म झाला आहे. रमेश बैस हे मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते. 1978 मध्ये ते सर्वात आधी नगरपालिकेत निवडून आले होते. त्यांनतर 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य देखील होते. त्याचबरोबर त्यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. रमेश बैस याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल होते.
“दीडशे नव्हे तर दोनशे जागा निवडून दाखवणार”, देवेंद्र फडणवीस कडाडले