गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्रातील सार्यानंच्याच परिचयाच झालं आहे. आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणी कलाकार म्हणजेच गौतमी पाटील. लावणी क्वीन (हा queen) म्हणून प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. गौतमीने नृत्यातील तिच्या अदाकारी आणि हावभावामुळे सार्यांनाच वेड केलं आहे.
अजित पवार यांनी राहुल कलाटेंना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “माझी विनंती आहे की…”
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. ती कायम दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत असते. गौतमी पाटील हीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. पण काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमी पाटील लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीने केला भाजपमध्ये प्रवेश
गौमतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. तसेच राजकीय क्षेत्रातून देखील गौतमीवर टिका करण्यात आली. यादरम्यान, अजित पवार यांनी देखील याबाबत चार दिवसांपूर्वी भाष्य केलं आहे. त्यांच्या त्या वक्तव्यावर गौतमी पाटीलने प्रतिउत्तर दिले आहे.
गौतमी म्हणाली की, दादा मला माफ करा. तुम्ही खूप मोठे आहात. त्यांच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, माझी चुकी झाली आणि मी त्याची माफी मागते. पण मलाच का विरोध केला जातो? असा सवाल गौतमीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट इशारा दिला होता. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स प्रकार होत असेल, तर हा मुद्दा अधिवेशनात मांडणार, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
गहू काढणीसाठी ‘हे’ कृषी यंत्र ठरतंय फायदेशीर; कमी वेळात आणि कमी पैशात होते जास्त काम