राजकीय वर्तुळात नेहमीच शाब्दिक युद्ध असते. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यामध्ये आघाडीवर असतात. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी यावरुनच संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे आहेत. त्यांच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. असे म्हणत हरिभाऊ बागडे यानी संजय राऊत यांना डिवचले आहे.
‘दादा मला माफ करा…’; गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी
आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यामध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे, वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे व नरेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले की, “संजय राऊत म्हणजे सामीलबाजा(बँड पथकात खुळखुळा वाजवणारा लहान मुलगा) आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे किती मनावर घ्यायचे याचा विचार करायला हवा.”
तसेच भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी देखील यावेळी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता काही न काही बोलतात. त्यामुळे आम्ही सकाळी टीव्ही बघणे बंद केले आहे. सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांना काय त्रास आहे? राऊतांना काही त्रास असेल तर त्यांनी तो अधिवेशनात विचारावा. असे अतुल सावे (Atul Save) यावेळी म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी राहुल कलाटेंना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “माझी विनंती आहे की…”